पुणे प्रतिनिधी
पिंपरी : मावळ तालुक्यातील लोहगड परिसरातील ग्रामपंचायतीमध्ये सोलार प्रकल्प कामाची ऑर्डर काढण्यासाठी वडगाव मावळ येथील विस्तार अधिकाऱ्याला ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुच पथकाने रंगेहात पकडले आहे. ही घटना गुरुवारी दि. ५ रोजी दुपारी ३ वाजता मावळ पंचायत समिती कार्यालयात घडली.
अंकुश किसन खांडेकर (वय ५७) असे लाचलुच प्रकरणी अटक केलेल्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. खांडेकर यांच्यावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून
मिळालेल्या माहितीनुसार, खांडेकर हे मावळातील १७ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून कार्यरत होते. मावळ तालुक्यात जवळपास सर्व गावात सोलर प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मावळात पहिला सोलार प्रकल्प पुसाणे गावात सुरू करण्यात आला होता. पुसाणे गाव देशातील सौर उर्जेवर चालणारे पहिले गाव आहे. लोहगड ग्रामपंचायतीमध्ये सोलार प्रकल्प कामाची ऑर्डर काढण्यासाठी खांडेकर यांनी तक्रारदार यांच्याकडे तब्बल ४० हजारांची लाच मागितली होती. तसेच त्याच्यासोबत आणखी एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.












