पुणे : सह पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना बातमीदारामार्फत वडगाव मावळ येथील आंबेडकर कॉलनी येथे पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम जुगार खेळत व खेळवीत आहेत अशी माहिती मिळाली होती या बातमीच्या अनुषंगाने कार्तिक यांनी दि. १७ रोजी सायं. ९:५५ वा. आंबेडकर नगर मधील पशुवैद्यकीय दवाखाना शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून त्यामध्ये जुगार खेळत व खेळत असताना मिळून आलेल्या ताब्यात घेऊन त्यांची झेडपी घेतली असता जुगाडची साधने ५२ पानांची पत्ते असे दोन कॅट तसेच रोख रक्कम ४२,६००/रु. दहा मोबाईल तसेच दोन चार चाकी वाहने असा एकूण ६,४१,५००/ रु. किमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करत आरोपी यांना ताब्यात घेतले आहे.
१) दिनेश सौदानसिंग चव्हाण वय ३२ रा. वडगाव
२) राजेश मारुती तरस वय ४३ रा किवळे
३) अंकुश अशोक सुरवडे वय ३३ वडगाव
४) नंदकुमार खंड ढोरे वय ५७ रा. वडगाव
५) अविनाश बाळू काजळे वय ३१ नायगाव मावळ
६) रोहित अशोक ढोरे वय २४ रा. बोरेवडा, मावळ
७) अजय कैलास दनवे वय २७ रा. माऊ, मावळ
८) सागर भानुदास जांभळे वय ३२ रा. माऊ, मावळ
९) गजानन भीमा बाळशंकर वय ४०, रा. तळेगाव
असे ताब्यात घेतलेले इसमांची नाव आहे.
ही लोक त्या ठिकाणी तीन पत्ते नावाचा जुगार खेळत होते व खेळवत होते, यांच्यावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई मध्ये पो. हवा. नायकुडे, पो. शी. शिंदे, पो.शी. पवार, पो. हवा. संजय सुपे, पो. ना. शशिकांत खोपडे, पो. कॉ. अंकुश पाटील, यांनी छापे कमी योग्य ती मदत केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वडगाव पोलीस करीत आहे.












