प्रत्येक वाड्यावस्ती, उपनगरात रस्त्याच्या कडेला महिला पुरुष भाजीपाला विकत असत. पण, वाकडमधील म्हातोबानगरची गोष्टच वेगळी. तेथे रस्त्याच्या कडेला भाजीपाल्याप्रमाणे गांजा विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने चार महिलांना अटक करुन त्यांच्याकडून १ लाख १ हजार रुपयांचा १ किलो ४३० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. त्यांचा गांजा पुरविणार्या पिंपरीतील भाटनगर येथील दोघा महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. अंमली पदार्थाच्या विक्रीत एकाचवेळी चार महिलांना पकडण्याची ही पहिली वेळ आहे.
याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई मितेश यादव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १६२/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोनिका राजेंद्र वाडघरे, हर्षदा कृष्णा राऊत, गिता मुकेश यादव, माला अनिल गुंजाळ (सर्व रा. कृष्णा स्वीट होमसमोर, म्हातोबानगर, वाकड) आणि गिता मलकेकर, रेखा तामचीकर (रा. भाटनगर, पिंपरी) यांना अटक केली आहे. पुढील तपस वाकड पोलीस करत आहे.