पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १८ : लोणी काळभोर येथे तीन जणांवर पोलिसांकडून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.याप्रकरणी फिर्यादी याने लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.
निलेश मल्हारी बनसुडे ( वय २६, रा. राजवेली नगर चौक, बनसुडे मळा, इंदापूर, ता. इंदापूर, जि.पुणे ), ओम सोमदत्त तारगावकर ( वय २१, रा.महतीनगर, इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे ) रोहीत मच्छिंद्र जामदार ( वय २३, रा. जामदार गल्ली, कसबा पेठ, इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे ) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून दिवे घाट उतरत असताना आरोपींनी त्याची चारचाकी गाडी फिर्यादींच्या गाडीसमोर नेली. फिर्यादी दुर्लक्ष करून पुढे गेले असता आरोपींनी परत गाडीला कट मारून त्यांच्या दुचाकी समोर गाडी थांबवली.
आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत पिस्तुला सारख्या हत्याराने भीती दाखवत “तुझ्याकडे किती पैसे आहेत ते गपचूप काढून दे, जास्त ओरडा केला व जास्त बोलला तर जागेवरच खल्लास करून टाकतो” अशी धमकी दिली आणि फिर्यादी यांच्या खिशातील एकूण १,५०० रुपये रोख रक्कम हिसकावून पळून गेले आहेत.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर,श्री. रितेश कुमार यांच्या आदेशावरून आरोपीं विरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
आरोपीं विरोधात भादवि कलम ३९२,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ०५ श्री. विक्रांत देशमुख, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अश्विनी राख यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे श्री. दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. सुभाष काळे, पोलीस उप-निरीक्षक, हनुमंत तरटे, सर्वेलन्स अंमलदार, संदीप धनवटे, तेज भोसले, मंगेश नानापुरे, मल्हार ढमढेरे, संदीप धुमाळ यांनी केली आहे…












