पुणे : मैत्रिणीसोबत गप्पा मारत थांबलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत लगट करुन तिच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग केला. भररस्त्यात मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी वानवडी पोलिसांनी एका अल्पयीन मुलावर विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या १५ वर्षीय वडिलांनी सोमवारी (दि.२५) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन एका अनोळखी १५ वर्षीय अल्पवयीन मुलावर आयपीसी 354, 354(अ), पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.२५) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रामटेकडी येथील वाल्मिकी वस्ती येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी वाल्मिकी वस्ती येथील सार्वजनिक
रोडवर थांबलेल्या रिक्षामध्ये मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसली होती. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला.
त्याने मुलीचा हात पकडून तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करुन गैरवर्तन करुन विनयभंग केला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग करीत आहेत