पुणे : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे महाकवी वामनदादा कर्डक स्मृती पुरस्कार वामनदादा कर्डक यांचे सहकारी प्राचार्य रतनलाल सोनग्रा आणि महाकवी राजानंद गडपायले यांच्या पत्नी शांताई गडपायले यांना जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार, दि. 15 ऑगस्ट सायंकाळी 5:30 वाजता माता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज समोर येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका लताताई राजगुरू आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दिली.
वामदनदादा कर्डक स्मृती पुरस्कार जाहीर












