पुणे प्रतिनिधी
पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडीची चर्चा नेहमी होत असते. या वाहतूक कोंडीमुळे पुणे शहरात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नवीन उड्डण पूल उभारले गेले आहेत. एकेरी वाहतूक केली गेली आहे. त्यानंतर पुणे शहरातील वाहतूक कोंडी कायम असते. यामुळे पुणे प्रदूषणाची पातळी जास्त असते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याविषयावर अनेकवेळा सार्वजनिक व्यासपीठावरुन मत मांडले आहे. पुण्याची वाढ रोखण्याचा सल्ला ते देत असतात. त्यावेळी जगभरातील कोंडीसंदर्भात अमेरिकन संस्थेचा अहवाल समोर आला आहे.
वाहतूक कोंडीत देशातील तीन शहरे टॉप टेनमध्ये
वाहतूककोंडीमुळे पुणेकरांचा प्रवास जिकारीचा होता. सर्वात मंद गतीने हलणाऱ्या वाहनांमुळे पुणेकरांना चार, पाच किलोमीटर जाण्यासाठी अनेकवेळा तासभर वेळ लागतो. परंतु वाहतूक कोंडीच्या यादीत टॉप टेन शहरांमध्ये पुणे किंवा मुंबई शहर नाही. राज्यातील दुसऱ्याच शहराचे नाव यासाठी पुढे आले आहे. अमेरिकन संस्थेने केलेला हा अहवाल आहे. त्यात जगभरातील पहिल्या दहा शहरांमध्ये भारतामधील एकूण 3 शहरे आहेत. त्यात पुणे नाही.
महाराष्ट्रातील कोणतं शहर यादीत ?
अमेरिकेतील नॅशनल ब्यूरो ऑफ इकोनॉमिक्स रिसर्च (National Bureau of Economic Research) म्हणजेच NBER या संस्थेचा हा अहवाल आहे. या संस्थेने जगभरातील अहवालामध्ये भारतामधील पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता, बिहारमधील आरा या शहरासह महाराष्ट्रातील एका शहराचा समावेश आहे. त्यात पुणे आणि मुंबई नाही. तर भिवंडी या शहराचा समावेश आहे.
कसा केला अभ्यास
एनबीईआर या संस्थेकडून जग भरातील 152 देशांमधील 1,200 पेक्षा जास्त शहरांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर वाहतूक कोंडी असलेल्या टॉप टेन शहरांची नावे सांगितले. त्यात अमेरिकेतील फ्लिंट शहरातील वाहतुकीचा वेग फारच संथ असल्याचे म्हटले आहे. तसेच बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये 4.5 किमी प्रवासासाठी तासभर लागत असल्याचे म्हटले आहे. अर्थात वाहतूक कोंडीत हेच शहर जगभरात पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकन संस्थेचा हा अहवाल पुणेकरांसाठी चर्चेचा ठरला आहे.












