पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.२१ : लोणावळा परिसरात मालवली,कार्ला,भाजे येथे पर्यटकांच्या वाहनांच्या काचा फोडून मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या चोरट्याला लोणावळा ग्रामीण पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना मनशक्ती केंद्र वरसोली परिसरात शनिवार (दि.१९) रोजी घडली होती.
अखिल सलीम व्होरा वय ३२ नूतननगर, गुजरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सदर पोलीस तपासात घटना स्थळाच्या ठिकाणी सी.सी.टीव्ही फुटेज मध्ये एक इसम इनोव्हा कारच्या काचा फोडत असल्यातचे आढळे आहे. त्याचं वेळी सदर परिसरात संशयित काळ्या रंगाची टोयोटा कंपनीची इनोव्हा कार फिरत असल्याचे दिसून आले. सदर आरोपीची झाडाझडतीत सहा मोबाईल,पाच पर्स, दोन बॅगा, दोन पवार बँक, दोन घडले, रोख रक्कम असा एकूण १२ लाख रुपये किंमतीचा मुद्दे माल जप्त केला आहे.
सदर आरोपी विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीसात भा.द.वि.४७९,४२७, दोन गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीला २२ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन पोलीस कस्टडी रिमांड ठोठावण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक नितेश गट्टे, सह पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक भरत भोसले, सह फौजदार युवराज बनसोडे, पोलीस हवालदार नितेश कवडे, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस हवालदार बाळकृष्ण भोईर, पोलीस हवालदार विजयभाऊ मुंडे यांच्या पथकाने केली आहे.












