पुणे प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत तळेगाव स्टेशन चौक जवळ असलेल्या जनता सहकारी बँक शेजारी एक इसम गांजा विक्री करित आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड आयुक्तालयतील अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली असता त्यांची एक टीम सदरच्या ठिकाणी पोहोचली असता त्या ठिकाणी विशाल वसंत पलांगे (वय ४३ रा. धोत्रे चेंबर्स, जनता सहकारी बँक च्या पाठीमागे, तळेगाव स्टेशन) हा गांजा विक्री करताना त्यांना दिसून आले.
गांजा विक्री करणाऱ्या या इसमाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्या कब्जात ९०,०००/ रु. किमतीचा ०३ किलो ६०० ग्राम वजनाचा गांजा अढळून आला, ते जप्त करत त्याला विचारलं असतं त्याने हा गांजा सुनील शिंदे (रा. तळेगाव स्टेशन शिवाजी महाराज चौक) ज्याच्याकडून विक्रीकरिता आणला होता अशी कबुली दिली.
यासंदर्भात अमली पदार्थ विरोधी पथक चे पोलीस शिपाई रणधीर माने यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये फर्याद दिली असून विशाल पलंगे व सुनील शिंदे यांच्या विरोधात एन.डी.पी.सी. ॲक्ट कलम ८(क), २०(ब)ii(ब), २९ प्रमाणे गुन्हा तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विशाल पलंगे हा पोलिसांचा ताब्यात असून सुनील शिंदे यांचा शोध तळेगाव दाभाडे पोलीस करत आहे.












