पुणे प्रतिनिधी
पुणे दि. २६ : स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी बदल्यात्या काळची दिशा ओळखून विद्यार्थ्यांनी विशिष्ट प्राविण्य आत्मसात करणे ही एक काळची गरज आहे.पारंपरिक शिक्षणासोबत कौशल्य विकासाचे विद्यार्थ्यांना मार्ग खुले करून देतील. विद्यार्थ्यांनी बहुविद्याशाखीय ज्ञान आत्मसात करून समाजाचे प्रश्न सोडवावे. असे मत प्रकल्प आधारित शिक्षण, विश्वनिकेतन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी संचालक डॉ विकास शिंदे यांनी आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत बोलत होते.
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात प्रकल्प आधारित शिक्षण (प्रोजेक्टबेस लेअरनिंग) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत प्रकल्प आधारित शिक्षण, विश्वनिकेतन इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजीचे संचालक डॉ विकास शिंदे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च प्राचार्या डॉ अनुपमा पाटील, उपप्राचार्य डॉ सुनील डंभारे, कुलकचिव वाय के पाटील, रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ अजय पैठणे, तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो. तेजश्री गुळवे यांनी केले तेर डॉ अनिकेत कोळेकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम आयोजनासाठी डॉ वंदना पाटील यांनी समन्वयक म्हणून काम केले.
डॉ डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रिअर ऍडमिरल अमित विक्रम, डी. वाय. प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस एस. पाटील , संस्थेचे चेअरमन सतेज डी. पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.












