पुणे प्रतिनिधी
पुणे दि.१० : पुणे मनपा उडाण पुला खालून पायी चालत जाणाऱ्या महिलेची एका अनोळखी इसमाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना रविवार दि.२ रोजी घडली असून आरोपी विरोधात शिवाजी नगर पोलीस स्थानकात पीडीत महिलेने फिर्याद दिली होती.
तपास पथकातील हवालदार रणजित फडतडे यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करून गुप्त बातमीदार मार्फत सदर आरोपी हा मनपा उडाण पूल खाली थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक साळवे व स्टाफ हे मनपा उडाण पुला खाली सापळा रचला होता. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे. लक्ष्मण तुकाराम घोडे वय ४५ रा. रामनगर, वारजे माळवाडी असे अटक करण्यात आल्याचे नाव आहे. दाखल गुन्ह्या बाबत अधिक चौकशी केली असता सदर गुन्हा आरोपीने काबुल केला आहे.
अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग,प्रवीण कुमार पाटील पोलीस उप आयुक्त परी-१ संदीप गिल, सहा.पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग रमेश कुवर, यांच्या मार्गदर्शन खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने,पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड, पोलीस उप निरीक्षक प्रताप साळवे, पोलीस उप निरीक्षक मनीषा जाधव,पोलीस हवालदार रणजित फडतडे,बशीर सय्यद, रुपेश वाघमारे, आदेश चालवादी यांनी केले आहे.












