पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०८ : पिंपरी मुख्य अग्रिशमन केंद्रास दुपारी चिंचवड येथील झोपडपट्टी पुनर्वसन इमारत येथील रूमला आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे.मुख्य अग्निशमन केंद्राच्या तीन अग्रिशमन वाहनाबरोबर प्राधिकरण थेरगाव, रहाटणी या उपग्रिशमन केंद्राचे प्रत्येकी एक अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पुनर्वसनातील इमारत क्रमांक ०५ च्या पहिल्या मजल्यावर असलेल्या १०९ क्रमांकाच्या खोलीमध्ये विध्या, कापड व्यवसाय करणारे अशोक तेलंग यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात कपडे चिंध्या असल्याने सदरच्या कपड्याने आग पकडून इमारतीच्या पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर धुराचे लोट पसरले होते.
अग्निशमन दलाच्या जवानाकडून इमारतीतील लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. इमारतीमधील सर्व रहिवाशांना तळमजल्यावर सुखरूप उभे करण्यात आले. एका बाजूने बचाव कार्य करीत असतानाच दुस-या बाजूने अग्रिशमन कार्य चालू होते. अथक प्रयत्नांनंतर आग विझवण्यात आली.
या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही किंवा कोणतीही व्यक्ती जखमी झाली नाही. सर्व नागरिक सुखरूप असल्याची खात्री अग्रिशमन दलाकडून करण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे, चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णराव खराडे उपस्थित होते.
सदर आगीमध्ये चिंध्या, कपडे, फर्निचर, फ्रिज यांचे नुकसान झाले असून आगीचे स्पष्ट कारण समजू शकले नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ०४ अग्रिशमन केंद्रातील एकूण ३० हून अधिक जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी व जिवितहानी टाळण्यासाठी अथक प्रयत्न केले.












