
पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २१ : शनिवार (दि २१) रोजी दैनिक राज्य लोकतंत्र आणि पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने एका व्याख्यानमालेचे आणि गरबा – दांडियाचे आयोजन करण्यात आले होते.
आज या व्याख्यान सत्राच्या सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड बार कोर्ट रूम, नेहरूनगर येथे दुपारी 2 वाजता श्री प्रेम रावत जी का नया परिचय या विषयावरील व्हिडिओ दाखविण्यात आला तसेच सायंकाळच्या सत्रात गरबा – दांडियाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास श्री. कृष्णत कुंभार ( राजविद्या केंद्र ), जगन्नाथ अगरवाल, ॲड. मनोज अगरवाल,पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, उपाध्यक्षा ॲड. जयश्री कुटे, ॲड. शीतल चौधरी, ॲड. भाग्यश्री भोईर, ॲड. जयश्री गोरे, ॲड. पौर्णिमा मोहिते, ॲड. सविता तोडकर, ॲड. संगीता कुशलकर, ॲड. मोनिका गाढवे, ॲड. नीलम जाधव, ॲड. सारिका जॉन, ॲड. अस्मिता पिंगळे, ॲड. वैष्णवी काकडे, ॲड. मानसी उदासी, ॲड. वैशाली जाधव, ॲड. पूजा बदे, ॲड. पूनम शर्मा,ॲड. तारा नायर आणि सर्व वकील भगिनी उपस्थित होत्या.
सगळ्या वकील भगिनींनी त्यांच्या व्यस्त आयुष्यातून वेळ काढून काही वेळ का होईना गरबा – दांडियाच्या या मनोरंजन कार्यक्रमात दंग झाल्या. या वेळी अध्यक्ष नारायण रसाळ यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपाध्यक्षा जयश्री कुटे यांनी वकील भगिनींसोबत गरबा दांडिया या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.












