दि.२५. व्यापाऱ्याची १४ लाख रुपयांची लुटमार करणाऱ्या आरोपींच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पिंपरीतील होलसेल कापड दुकानदार मोहनदास सिरुमल तेजवाणी वय- ६२ वर्षे रा . विजयनगर काळेवाडी पुणे यांनी दि.१८ रोजी वाकड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये दि. १८ सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुकानातील रोख रक्कम १४ लाख रुपये घेवून बालाजी लॉन्स समोर काळेवाडी येथे दोन अनोळखी चोरटयांनी मोटार सायकलवरून येवून त्यांना धक्का देवून त्यांच्याकडील १४ लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग चोरून नेली असल्याचे म्हंटले होते.
त्यानुसार भा.द.वी कलम ३९४,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घडलेल्या घटनेचे गांभीर्य ओळखुन मा.श्री . गणेश जवादवाड , वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी तपास पथकातील सपोनि संतोष पाटील , पोउपनि सचिन चव्हाण यांना या गुन्हयाचा तपास करुन आरोपीस तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर या गुन्ह्याबाबत सिसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच बातमीदारांचे मार्फत चोरटयांचा शोध सुरु केला. बातमीदारांमार्फत या गुन्ह्यात सुहास जोगदंड आणि आदित्य घायतडक अशी आरोपींची नावे असल्याचे समोर आले. या आरोपींना मोटार सायकलसह काळेवाडी परिसरातून मोठ्या शिताफतीने ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार सुहास नवनाथ जोगदंड वय- २२ वर्षे रा.गिरजुबाबा मंदीरामागे १९ नंबर बिल्डींग शेजारी, बौध्दनगर, पिंपरी पुणे आणि आदित्य संतोष घायतडक वय २१ वर्ष रा .१५ नंबर बिल्डींग शेजारी बौध्दनगर पिंपरी पुणे अशी असल्याचे समजले .
आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरी केलेल्या रक्कमेपैकी काही रक्कम मिळाली. अधिक चौकशी केली असता या गुन्ह्यात त्यांचे अजून दोन साथीदार यांनी मिळून कट कारस्थान रचल्याचे निष्पन्न झाले . त्यामुळे सदर गुन्हयात भादवि कलम १२० ( ब ) अशी कलमवाढ करण्यात आली. साथीदार दोन्ही आरोपी अमन आजिम शेख वय २० वर्ष रा.आर्य समाज चौक, पुनम फर्निचर जवळ, रामकृष्ण नगर , पिंपरी पुणे, गणेश भुंगा कांबळे वय २१ वर्ष रा. पाचपिर चौक , पंचनाथ कॉलनी, काळेवाडी, पुणे मुळ रा . भाटनगर, पिंपरी यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे .
अटक चार आरोपी यांच्याकडे अधिकचा तपास केला असता गुन्हयात चोरी केलेली एकूण रोख रक्कम १०,४०,००० / – रुपये व गुन्हा करणेसाठी वापरलेली होंडा शाईन मो.सा.नं. एमएच . १४. जेएफ . २७५२ असा एकुण ११,१०,००० / – रुपयांचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे. सदरची कारवाई मा . श्री . विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , मा . श्री.डॉ . संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त , मा . श्री . वसंत परदेशी , अपर पोलीस आयुक्त , मा . श्री . डॉ . काकासाहेब डोळे सो , पोलीस उप आयुक्त , परि २ पिंपरी चिंचवड , मा . श्री . डॉ . विशाल हिरे , सहा . पोलीस आयुक्त सो , वाकड विभाग , पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली मा.श्री . गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक , मा.श्री . विठ्ठल साळुंखे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफी बाबाजान इनामदार , सपोफी . राजेंद्र काळे , पोहवा संदीप गवारी , पोहवा स्वप्निल खेतले , पोहवा . दिपक साबळे , पोहवा अतिश जाधव , पोहवा . प्रमोद कदम , पोहवा बंदु गिरे , पोना . प्रशांत गिलबीले पोना अतिक शेख , पोना विक्रांत चव्हाण , पोना . राम तळपे , पोशि . अजय फल्ले , पोशि .भास्कर भारती , पोशि स्वप्निल लोखंडे , पोशि सौदागर लामतुरे , पोशि कौंतेय खराडे , पोशि . विनायक घारगे , पोशि रमेश खेडकर , पोशि . सागर पंडीत ( परि ०२ कार्यालय ) यांनी केली आहे .












