पिंपरी, दि. १२ : पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित व्हिनस आर्ट फाउंडेशन तर्फे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या आयोजित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर शेठ जगताप यांच्या हस्ते मंगळवारी (१५ ऑगस्ट) सायं. ५ वाजता करण्यात येणार आहे.
व्हिनस एनआयडी क्लासेस सभागृह, चिंचवड गाव येथे या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १५ ऑगस्ट आणि १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अवकाश निर्मितीकार सुहास एकबोटे, मनपा उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, माजी नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, उद्योजक मदन भोईर, दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ नाना शिवले आदि उपस्थित राहणार आहेत.
११ वी आणि १२ वी चे शिक्षण घेऊन पुढे डिझाईन क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी आयआयटी, एनआयडी, एनआईएफटी या शासकीय नामांकित संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हिनस आर्ट फाउंडेशन मार्गदर्शन करते. मागील वर्षी येथे शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांनी दोन वर्षात केलेल्या आर्टवर्कचे हे चित्र प्रदर्शन आहे. विद्यार्थी तसेच पालकांनी आणि चित्रकला क्षेत्राची व डिझाईन क्षेत्राची आवड असणाऱ्यांनी या चित्र प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष अपूर्वा पाटील आणि सचिव कल्पना पाटील यांनी केले आहे.












