पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १४ : हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र व विजयादशमीचे औचित्य साधून हिंदू शौर्य दिन – विराट हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील ज्येष्ठ वकील अश्विनीकुमार उपाध्याय यांचे व्याख्यान होणार आहे.
तसेच यावेळी प्रा. डॉ. धनंजय सोमनाथ भिसे यांना स्व. प्रा. एकनाथ नाणेकर स्मृती समाज भूषण पुरस्कार २०२३ आणि अरुण श्रीपती पवार यांना स्व. संजय आर्य स्मृती समाजभूषण पुरस्कार २०२३ संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक पं. धर्मवीर आर्य, उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव उत्तम दंडीमे, समन्वयक कैलास बारणे, संयोजक सुहास पोफळे यांनी दिली आहे.
शनिवारी (दि.२१ ऑक्टोबर) सायंकाळी ५:३० वाजता, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित केलेल्या या मेळाव्यास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.












