पुणे प्रतिनिधी
पुणे दि.२ : गेल्या तीन दिवसामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडून विशेष मोहिमे अंतर्गत शहरातील तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. ही कारवाई २८ व ३१ जुलै रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास करण्यात आली आहे. विमानतळ,हडपसर,येरवडा येथून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडून विमानतळ परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई मांढरे यांना मिळालेल्या माहितीवरून पोरवाल रोड येथील आयधीजीन कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गेट समोर, लोहगाव येथे अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. राहुलकुमार भुरलालजी साहू (वय ३२ मु.पो.मंगलवाडा, ता.दूंगालाजि.चितोडगड, राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या कडून १ कोटी दहा लाख रुपये किंमतीचा ५ किलो ५१९ ग्रॅम अफिम अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरोधात एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), १७ (क) अंतर्गत विमानतळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच हडपसर परिसरातील गंगानगर फुरसुंगी येथे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.
मोहनलाल मेगाराम बिष्णोई (वय २४ रा. मु.पो. ता.गुडामालानी,जि. बाडनेर, राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या कडून ६० हजार रुपये किंमतीचा ३ किलो २९ ग्रॅम अफिम अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरोधात हडपसर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या सोबतच येरवडा स्मशान भूमी, श्री बालाजी सुगंधालय येथून सोनू साहेबराव कोळसे (वय ४४ रा. सुभाष कॉलनी, श्रीरामपूर) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या कडून २ लाख रुपये किंमतीचा ९ किलो ९३५ ग्रॅम गांजा व मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरोधात येरवडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सह पोलीस आयुक्त गुन्हे -२ संतोष गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक – २ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, संतोष देशपांडे, प्रशांत बामोदंडी, संदीप जाधव, रवींद्र रोकडे, मयूर सूर्यवंशी चेतन गायकवाड, संदीप शेळके, महेश साळुंखे साहिल शेख, नितीन जगदाळे, अजीम शेख, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड, महिला पोलीस अमलदार देशा खेवलकर यांनी केले आहे.
शहरात तीन ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ची कारवाई












