आपण पाहतो आधी मोठया प्रमाणात स्त्री भ्रूण हत्या ही व्हायची.पण त्याच्यावर आता सरकारी निर्बंध लावण्यात आल्यामुळे डॉक्टर हे अशा गुन्ह्यात साथ देत नाहीत.म्हणून मुलगी नको असणारे वेगळा मार्ग अवलंबू पाहत आहेत.पण मुलाला न स्वीकारणारे पालक अशा घटना क्वचितच पाहायला आणि बघायला मिळतात.अशीच घटना लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
शंकर क्षीरसागर ( पोलीस अंमलदार ) लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी लोणीकंद पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदवली असून अज्ञात पालकांचा शोध सुरु आहे.
दि.०६ रोजी ०१:०० वाजता मयुर तारांगण सोसायटी मागे,शिवरकर वस्ती, हेमचंद गुप्ता यांच्या मोकळ्या जागेत लोहगाव रोड, पुणे या ठिकाणी दोन महिन्यांचे पुरुष जातीचे अर्भक सापडले आहे.या अर्भकांचा जन्म अनैतिक संबंधातून किंवा संबंधातून झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्याची जबाबदारी न स्वीकारता त्याला जन्म देऊन अज्ञात पालकांनी त्याला उघड्यावर टाकून निघून गेले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये भादंवि ३१७,अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक महादेव लिंगे हे करत आहेत.












