पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०८ : वंदेमातरम चौकातून घरी निघालेल्या तरुणाच्या गाडीची चावी कडून व किशातील अकराशे रुपये घेऊन तरुणाला शिवीगाळ व मारहाण करून धमकी देत दुचाकी पळवूननेणाऱ्या टोळी प्रमुखा सह तिघांवर मोक्का कारवाई करण्या आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ५७ वी मोक्का कारवाई आहे.
शुभम ऊर्फ चम्या संजय कांबळे टोळी प्रमुख (वय १९ रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) फरार असून टिल्ली ऊर्फ इरफाम गुलाम मोहम्मद शेख (वय १९ रा. रामटेकडी, हडपसर),मंगेश रवी जाधव (वय २० रा.रामटेकडी, हडपसर), फिटर प्रेम्या ऊर्फ प्रेम अनिल थोरात (वय १९ रा. नवीन म्हाडा कॉलनी, हडपसर) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सदर परिसरात गुन्हेगारी टोळी तयार करून दहशत निर्माण केली होती. गेल्या १० वर्षां पासून बेकायदेशी कृत्य चालू होते. खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी करणे, बेकायदेशी शस्त्र जवळ बाळगणे, लूटमार करणे, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहे.
सदर आरोपी विरोधात भा.द.वी.कलम ३९२, ३४ आर्म अॅक्ट ४(२५) मोक्का १४२,३७ (१) (३) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सह. पोलीस आयुक्त वानवडी विभाग शाहूराजे साळवे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्ता रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच विक्रांत देशमुख, सह पोलीस आयुक्त वानवडी विभाग शाहूराजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव शेलार, पोलीस अंमलदार अमोल घावटे, उत्तरेश्वर धस, पुनम राणे, हनुमंत कांबळे, दिनेश जाधव यांनी केले आहे.












