पुणे । प्रतिनिधी
पुणे दि.१९ : शेतात गाडी का घातली याचा जाब विचारला असता शेतकरी व त्याच्या भावाला जबर मारहाण केल्याची घटना खेड तालुक्यातील भिवरे वाडी येथे घडली आहे.
चांगदेव काळे यांनी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे व या तक्रारच्या अनुषंगाने आळंदी पोलिसांनी शिवाजी बजबा काळे वय ६५,विजय शिवाजी काळे वय ४०, तानाजी पोपट कोळेकर वय ३० व एक महिला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दि. १८ रोजी चांगदेव भिवाजी काळे हे ३० वर्षीय शेतकरी स्वतःच्या शेतात शेत काम करत असताना आरोपी विजय शिवाजी काळे या ४० वर्षीय युवकाने त्यांच्या शेतात चार चाकी टेम्पो घेऊन जाऊन त्यांच्या शेतीचे नुकसान केले.
या संदर्भात चांगदेव यांनी विजयला सदर बाबतचा विचारला असता काळे यांनी शेजारील शेतात काम करत असलेले त्यांचे वडील शिवाजी बजाबा काळे, तानाजी पोपट कोळेकर व एक महिला यांना हाक देऊन बोलून घेऊन या चौघांनी चांगदेव काळे यांना शिवीगाळ केली व त्याचप्रमाणे हाताने व लाथा बुक्क्याने मारहाण करत तुला संपून टाकू अशी धमकी दिली.
सोबतच आरोपीने त्यांच्या हातात असलेल्या लाकडी दांडके व धारदार कुऱ्हाडीने चांगदेव यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. हा प्रकार बघून चांगदेव यांचे मोठे भाऊ त्यांच्या मदतीसाठी पळून आले असता आरोपींनी त्यांनाही लाथा बुक्क्याने व दगडाने मारहाण करत घटनास्थळावरून पळून गेले.
आरोपी यांच्या विरोधात भा.द.वी. कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून चारही आरोपींना अजून अटक झालेली नाही. आळंदी पोलीस तपास करत आहे.












