आळंदी : आळंदी येथे ४ इसमांनी शेतात घुसून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. हि घटना सोमवारी (दि २६) रोजी सकाळी साडे सात वाजतेच्या दरम्यान घडली आहे.
सदर घटनेची तक्रार हेमंत तोडकर, वय ४७ वर्षे, रा. ८/०१, मंगळवार पेठ, पुणे यांनी लोणी काळभोर पोलीस स्थानकात दिली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, फिर्यादी यांची म्हातोबाची आळंदी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. सोमवारी सकाळी फिर्यादी आपल्या शेता मध्ये गेले असताना, नमुद इसमांनी त्यांच्या दोन साथीदारांसोबत ट्रॅक्टर व मोटार सायकलवर शेतात येवुन फिर्यादी यांना पिस्तुल व सुन्याचा धाक दाखवला. तसेच फिर्यादी यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालुन, त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
सदर घटनेची फिर्याद लोणी काळभोर पोलीस स्थानकात दाखल केली असून सदर आरोपींवर भादविक ३०७, ५०६, ३४ महा. पो. का. क. ३७ (१) (३) १३५, आर्म अॅक्ट ३ (२५). क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट क. ३ व ७ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतात घुसून जीवे मारण्याचा प्रयत्न












