पुणे | प्रतिनिधी
पुणे,दि.२१ : शोरूम कामगाराने त्याच्या मालकाला लाखोंचा गंडा घातल्याची बातमी उघडकीस आली आहे.ही घटना चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
गौरव जाधव [ वय २६, रा. गणेशनगर बोपखेल, पुणे ] असे फिर्यादीचे नाव असून त्यांनी त्यांच्या शोरूम मध्ये कामाला असणाऱ्या एका इसमाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी यांचे औंध येथील वेस्ट एन्ड मॉल मध्ये वूड लँड नावाचे एक शोरूम आहे.आरोपी हा या वूड लँड शोरूम मध्ये स्टोअर इन्चार्ज या पदावर काम करतो.शोरूम मध्ये काम करत असताना आरोपीने दि.२७\०५\२०२३ ते ११\०६\२०२३ या कालावधीत फिर्यादी यांची नजर चुकवून शोरूम मध्ये चोरी केली आहे.
शोरूम मध्ये केलेल्या चोरीमध्ये त्याने ३३ नग शूज जोडी,४१ नग गारमेंट कपडे,असिक्सेसरीज मध्ये १ बेल्ट,७ नग शूज पॉलीस,२ नग सॉक्स,२ नग वॉलेट,१ लेस असा एकूण १३ नगाचा ३,६९,५२० किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
आरोपीवर भादंवि कलम ३८० अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.तो फरार असून त्याचा शोध सुरु आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर.सी.चाळके हे करीत आहेत.












