पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २५ : श्रीगोंदा – कर्जत – जामखेड जिल्हा वकील बार यांच्या तर्फे सन्माननीय न्यायमूर्ती मा. श्री. अभय ओक ( सर्वोच्च न्यायालय, भारत ) यांच्या कायदे विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. २६ रोजी सकाळी १०:१५ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा ( जि. अहमदनगर ) येथे या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
ॲड. संतोष मोटे पाटील (अध्यक्ष- श्रीगोंदा, कर्जत, जामखेड जिल्हा वकील बार असो.), ॲड.हरिश्चंद्र महामुनी (अध्यक्ष- कर्जत वकील संघ), ॲड.अशोक रोडे (अध्यक्ष- श्रीगोंदा वकील संघ) ॲड.ए. के. शेख (अध्यक्ष जामखेड वकील संघ) यांनी या व्याख्यान मालेचे आयोजन केले आहे.
या कायदे विषयक मार्गदर्शन व्याख्यानमालेत न्यायमूर्ती मा. श्री. अभय ओक ( सर्वोच्च न्यायालय, भारत ) हे भारतीय राज्यघटनेतील कलम २१ विषयी माहिती देणार आहेत. तसेच नागरिकांचे मूलभूत अधिकार याविषयी ते बोलणार आहेत. वकीलवर्ग,कायद्याचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व इतर सर्वांसाठी हे कायदे विषयक मार्गदर्शनाचे चर्चासत्र खुले असणार आहे.
मा. श्रीमती विभा कंकणवाडी (न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई), मा. संतोष चपळगावकर (न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई), मा. श्री. सुधाकर यार्लगड्डा साहेब (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अ.नगर), ॲड.जयंत जायभावे (मैंबर, बार कौंसिल ऑफ इंडिया), ॲड.विवेकानंद घाटगे (अध्यक्ष, B. C. M. G.), ॲड.उदय वारूंजीकर (उपाध्यक्ष, B. C. M. G. ) इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.












