कॉमर्सला प्रवेश घेतलेले विद्यार्थी हे करिअरच्या अनेक वाटा शोधू शकतात. कॉमर्समधल्या याच संधींविषयी अधिक माहिती देण्यासाठी ‘कॉमर्स मधील करिअर संधी’ यावर अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या श्री शाहू मंदिर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित केले होते.
व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विनोद महाले (Director ICA eduskills Pvt. Ltd.) , श्री. सुदर्शन डागा (Director ICA eduskills Pvt. Ltd.) , प्रभारी प्राचार्य डॉ. विलास पाटील, डॉ. प्रवीण जाधव (वाणिज्य विभाग प्रमुख व IQAC प्रमुख), डॉ. राणी शितोळे (समन्वयक कॉमर्स असोसिएशन) उपस्थित होते.
कॉमर्स मधील करिअर संधी विषयी आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कॉमर्स चा अभ्यासक्रम आणि कॉमर्स मधील करिअर संधी या विषयी श्री. विनोद महाले यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं.
या व्याख्यानासाठी डॉ. नेहा नलावडे, डॉ. यास्मिन शेख, प्रा. प्रज्ञा भोजने, प्रा. जीवन घाणेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राणी शितोळे यांनी केले. तसेच पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रवीण जाधव यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शीतल सुकटे, यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. किशोर नवले यांनी केले.
श्री शाहू मंदिर महाविद्यालयात आयोजित करण्यात आले ‘कॉमर्स मधील करिअर संधी’ यावर व्याख्यान
