
पुणे | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन आणि दैनिक राज्य लोकतंत्र यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
व्याख्यान सत्राच्या चौथ्या दिवशी पिंपरी चिंचवड बार कोर्ट रूम, नेहरूनगर येथे (दि.१८) रोजी दुपारी २ वाजता वंदना रावलल्तू यांच्या संगीताचे जीवनातील महत्त्व ह्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास ॲड. पूनम राऊत, ॲड.योगिता तळपे, ॲड. जयश्री खोंद्रे, ॲड. रूपा मोरे, ॲड. नीलम जाधव, ॲड. ऐश्वर्या शिरसाठ, ॲड. तारा नायर, ॲड. सारिका जॉन, ॲड. संकल्पा वाघमारे, ॲड. शोभा कदम, ॲड. मोनिका गाढवे, ॲड.सोनाली गुंजाळ, ॲड. सविता तोडकर, ॲड. प्रिया किरण गायकवाड आदी उपस्थित होत्या.
वंदना रावलल्तू यांनी यावेळी संगीताचे महत्त्व पटवून दिले. संगीत हे जीवनातील अविभाज्य भाग आहे. संगीताची सुरुवात ही अंगाईपासून होते.
वाद्य आणि संगीत माणसाच्या जीवनात अपार शांती आणि आनंद देतो. पक्ष्यांच्या किलबिलाटात, पाण्याच्या आवाजात, निसर्गातील प्रत्येक गोष्टीत संगीत सामावलेले असते. संगीत प्रत्येक वेळी औषधाचे काम करत असते असे त्या यावेळी म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, द्वापार युगात श्रीकृष्ण बासरी वाजवत असे त्यावेळी गोपिका आणि प्राणी देखील संगीतात रमायचे. संगीत आपल्याला अध्यात्माशी जोडते.संगीताने श्वसनाचे विकार, रक्तदाबाचा त्रास, बीपी नाहीसे होते.संगीतातील राग आजारपणाचे सोबती आहेत.
या व्याख्याना दरम्यान अनेक वकील बंधू आणि भगिनींनी त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांनी संगीताशी निगडित प्रश्नांची उत्तरे दिली.
यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन च्या उपाध्यक्षा सौ. जयश्री विलास कुटे यांनी उपस्थित वक्त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.












