मागील अनेक दिवसांपासून शाळा व क्लासला जाताना रोडरोमीयोंनी १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. तसेच तिचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. रोडमियोंच्या सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. ही घटना आंबेगाव येथे १३ मार्च २०२४ रोजी घडली आहे.
याबाबत पीडित मुलीच्या ५० वर्षीय वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.२६) फिर्याद दिली आहे. यावरुन अजिंक्य आवटे (रा. भोसरी) व सुजल खुणे (रा. आंबेगाव पठार) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३५४ ड), ५०६, ३४ सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.