पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २० : पुण्यात संपत्तीच्या वादावरुन धक्कादायक प्रकार घडला आहे. पुणे येथील एका व्यक्तीने एका महिलेची साडी चोरून कोथरूड येथे एका तांत्रिकाकडे नेऊन त्याला लिंबू, टाचण्या टोचून अघोरी कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी चतुशृंगी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा यांना प्रतिबंध अधिनियम कलमा नुसार एकुण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिकेत विनोद सुपेकर यांनी तक्रार दिली आहे. पिडीत महिलेची आजी कांता सुरेश चव्हाण, मामा गिरीश सुरेश चव्हाण, सावत्र आई संगीता सुपेकर, सावत्र भाऊ स्वप्निल सुपेकर, चुलत बहीण सोनल सुपेकर व देवऋषी स्वप्निल भोकरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या आजी, मामा, सावत्र आई, भाऊ आणि चुलत बहीण यांनी संगनमत करून कट रचून प्रॉपर्टीच्या कारणावरून तसेच फिर्यादी यांच्या वस्तीतील मुलगा कृष्णा चांदणे याने त्याच्या पत्नीच्या कारणावरून फिर्यादीचे मामा यांना मारले होते. याचा राग मनात धरून जादूटोणा करण्याच्या उद्देशाने सदर महिलेच्या आईची साडी चोरण्यात आली होती.
त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांवर करणी करण्याचा कट रचला होता. त्यासाठी आईची साडी तसेच फिर्यादीची आई सुनिता सुपेकर, मावशी अनिता चव्हाण, काकु आशा सुपेकर व कृष्णा चांदणे याचे फोटो ठेवुन फोटोचे व साडीचे बाजुला अंडी, टाचणे लावलेले लिंबू, भात कसले तरी काळीज, मटण, हळद, कुंकु, अगरबत्ती ठेवुन करणी करता जादू टोण्याचे अनिष्ट व अघोरी कृत्य केल्याचे समोर आले आहे. याबाबतचा अधिक तपास चतुशृंगी पोलीस करत आहेत.












