राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या वतीने येत्या २३ तारखेला औरंगाबाद येथे संविधान गौरव महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे.त्याची पूर्व तयारी व आढावा बैठक आज आमदार अण्णा बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणात पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला होता तेव्हाच त्यांनी फुले शाहू आंबेडकर विचार घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करेल, संविधानाला व त्याच्या मूल्याला कुठं ही धक्का लागणार नाही व सर्व बहुजनांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्य करेल ही भूमिका मांडली होती तीच भूमिका संविधान गौरव महामेळाव्या मधून अधोरेखित करण्यात येणार आहे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे व यासाठी पदाधिकाऱ्यांनी नियोजन करावे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष प्रा सुनील मगरे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार व आदरणीय अजित पवार यांचे कार्य घराघरात पोहचवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे व संविधान गौरव महामेळाव अतिशय भव्य दिव्य होईल यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांनी केली. आजच्या बैठकीचे उत्कृष्ट नियोजन सामाजिक न्याय विभाग पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजय औसरमल व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले याबद्दल देखील आमदार अण्णा बनसोडे यांनी कौतुक केले.
आजच्या या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा निहाय अध्यक्ष उपस्थित होते यामध्ये पुणे शहराचे जयदेव इसवे,सोलापूर जिल्ह्याचे प्रशांत भालशंकर,पुणे जिल्ह्याचे विकी लोखंडे,सातारा जिल्ह्याचे हरीश काकडे,सोलापूर शहर चे राजू बेनलागेवर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद साळवे, नितीन गायकवाड यांच्यासह पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे,प्रदेश सरचिटणीस गोरक्ष लोखंडे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, खजिनदार दीपक साकोरे, महिला कार्याध्यक्ष कविता खराडे,महिला अध्यक्ष- गंगा धेंडे, निर्मला माने,प्रदेश उपाध्यक्ष संदीप चिंचवडे,प्रदेश उपाध्यक्ष सचिन औटे , शहर उपाध्यक्ष शशिकांत घुले, यश खैरारिया, कुमार कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.