पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१६ : काल पिंपरी-चिंचवड मध्ये “सत्यशोधक” चित्रपटाची सविस्तर चर्चा घडवून आणली. या चर्चेत पब्लिसिटी, ब्रँडिंग, तिकीट बुकिंग आणि शो बुकिंग या विषयी चर्चा झाली.
काही व्यक्तींनी अजून काही महत्त्वाच्या व्यक्तीसोबत मिटिंग घेण्याचे सुचवले. त्यातील महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष मा. हनुमंत माळी यांनी पिंपरी चिंचवड मधील पहिल्या शो ची बुकिंग पूर्णपणे मंडळासाठी घेतल्याचे जाहीर केले.
तसेच हाजी मस्तान मायनोरीटी पक्षाचे संघटक मा. संतोष भाऊ खाडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी पूर्ण एका शो ची जबाबदारी घेतली. त्यांच्या सहकार्यबद्दल मनापासून आभार मानले.
या मिटिंगला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच ओबीसी कृती समितीचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष मा. आनंदराव कुदळे, समता परिषदेचे महिला अध्यक्ष मा. वंदनाताई जाधव, उपाध्यक्ष ऍड. विद्या शिंदे, रजनी बोबडे, सूर्यकांत ताम्हाणे, राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीचे मा. माऊली बोराटे, लक्ष्मण पांचाळ, प्रसिद्ध सिंगर सचिन देठे, निर्माते आप्पासाहेब बोराटे, बाळासाहेब बांगर व शिवा बागुल उपस्थित होते.












