पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१७ : जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात २१ मतदार संघ, ८० लाख मतदार तसेच ८ हजारापेक्षा जास्त मतदान केंद्रे आहे. त्यामुळे निवडणूकीसाठी लागणारी यंत्रणा व तयारी इतर जिल्ह्यापेक्षा मोठ्या प्रमाणात करावी लागते. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १८ ते २९ या वयोगटातील मतदारांच्या नोंदणीच्या बाबतीत आपण मागे आहोत, ही चिंतेची बाब आहे. मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत सर्व समाजातील घटकांचा मतदार यादीमध्ये समावेश करणे, मतदार यादी अद्यावत, शुद्धीकरण आदी कामे करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासोबत मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहे.
तरुणांनी मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोदणी करुन निवडणूक प्रकियेत सहभागी व्हावे. यासाठी शाळा व महाविद्यालयांसोबत समाजातील सर्व घटकांनी मतदार नोंदणीच्या कामांसाठी एकत्र यावे असे आवाहन करत यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही डॉ. राजेश देशमुख म्हणाले.
श्री. पाटील आणि श्री. गुजराती यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. मतदार जागृती आणि मतदार नोंदणीसाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.












