पुणे पतिनिधी
पुणे दि ११ : समाज माध्यमावर घातक शस्रांचा फोटो ठेवून दहशत पसरवणाऱ्या दोन आरोपींना बिराजदारनगर व तरवडे वस्ती, हडपसर येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवार दि. ८ रोजी कोम्बिंग ओप्रेशन दरम्यान युनिट ५ कडील पोलिसांनी केली आहे. आरोपींकडून आठशे रुपये किंमतीचे दोन घातक शस्र जप्त करण्यात आले आहे.
पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पेट्रोलिंग व कोम्बिंग ओप्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. सदर दोन्ही आरोपी हे घातक शस्र घेऊन दहशत निर्माण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने अर्षद रफिक पटेल (वय २१ रा. आदर्शनगर,देवाची उरुळी,हांडेवाडी मूळ मु.पो. ता.परांडा जि. उस्मानाबाद) व उमर समीर शेख (वय १९ रा. सदर ) असे अटक करण्यात आल्याचे नावे आहेत.
आरोपी विरोधात हडपसर पोलीस स्थानकात रजि.नं १०००/ २०२३ भारतीय हत्यार कायदा कलाम ४(२५) व महाराष्ट्र अधिनियम कायदा ३७(१)(३) १३५ अंतर्गत आणि वानवडी पोलीस स्थानक येथे रजि.नं ३२२/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलाम ४(२५) व महाराष्ट्र अधिनियम कायदा ३७(१)(३), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहा.पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे, सहा.पोलीस आयुक्त सतीश गोवेकर,यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम,पोलीस उप निरीक्षक चैताली गपट, पोलीस अंमलदार अश्रुबा मोराळे, अकबर शेख,राहुल ढमढेरे, अमित कांबळे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले,दया शेगर, पल्लवी मोरे यांच्या पथकानी केली आहे.












