
पुणे दि.२६ : लोणीकंद पोलीस स्थानकाच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत तीन आरोपींना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षा करिता तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई परिमंडळ ४ चे पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे यांनी केली आहे.
सराईत टोळी प्रमुख अजय राजेंद्र माकर (रा. गोरे वस्ती रोड वाघेश्वर नगर वाघोली) व टोळी सदस्य रोहित दत्ता मंजुळे (रा.वाघेश्वर नगर, वाघोली), आकाश राजू दंडगुले (रा. वाघेश्वर नगर, वाघोली), हर्षद कुमार शिंदे (रा.लोणीकंद ता. हवेली, जि. पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. सदर आरोपींच्या हालचाली सार्वजनिक शांततेस व सुव्यवस्थेस धोका निर्माण करतील अशा झाल्या होत्या. त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे आवश्यक होते. लोणीकंद पोलीसांनी सदर आरोपींच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त, परिमंडळ यांच्याकडे पाठवले. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी तडीपार महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये दि. 22 ऑगस्ट पासून पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे शहरातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले. टोळी सदस्य रोहित दत्ता मंजुळे, आकाश राजू दंडगुले यांचेवर (दि.२६) तडीपारीचा आदेश बजाविण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, सहा. पोलीस आयुक्त संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे,
पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारूती पाटील, सीमा ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे, सागर कडू यांनी केले आहे.












