पुणे प्रतिनिधी
पुणे दि.१८ : सराईत वाहन चोरट्यांना तीन वाहनांसहीत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहन चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी (दि.१३) वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आलीम अल्ताफ पालकर (वय २६ रा. आलीम टॉवर,कोंढवा), अक्तर हसन शेख (वय २४ रा. ग्रीन पार्क, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुन्ह्यामध्ये चोरी झालेल्या वाहनांचा घटना स्थळाहुन १५० सीसीटीव्ही फुटेजचा पोलिसांकडून तपास सुरु होता. या दरम्यान पोलिसांकडून सदर परिसरात पेट्रोलिंग सुरु होते. सदर आरोपी हे बारणे रोड, मंगळवार पेठेत चोरीची रिक्षा थांबलेली असून त्यामध्ये दोन इसम बसले असल्याची गुप्त बातमी तपास पथकातील पोलीस अंमलदार हेमंत पेरणे व शरद घोरपडे यांना मिळाली.
त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडले. चौकशी दरम्यान सदरची रिक्षा नाना पेठेतून चोरी केल्याचे कबुल केले. तसेच ऑटो रिक्षा एम.एच १२ एफ सी ०३९८ व एम.एच १२ जे ई २२०० दुचाकी ही वाहने समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचे सांगितले. या आधिही आरोपींवर चोरी व घरफोडीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक संदीप गिल, सह पोलीस आयुक्त अशोक धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे, सौरभ थोरवे, पोलीस नाईक रहीम शेख, पोलीस हवालदार रोहिदास वाघेरे, प्रमोद जगताप, गणेश वायकर, शहाजी केकान, दत्तात्रय भोसले, पोलीस अंमलदार अमोल शिंदे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी केले आहे.












