पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०८ : सराईत वाहन चोरांकडून ५ वाहने जप्त करून वाहन चोरणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कुणाल सुरेश बधे (वय २९ रा. मु.पो. राजने, ता. वेल्हे, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईटचे नाव आहे. आरोपीवर तीन पोलीस स्थानकात गुन्ह्यांची नोंद उघड झाली आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्थानकाच्या हद्दीत वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पथक पेट्रोलिंग करत होते. सदर आरोपी अमृत खान, लिपाणे वस्ती येथे चोरी केलेली दुचाकी घेऊन थांबला असल्याची माहिती पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, हर्षल शिंदे, सचिन गाडे यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत आरोपी सह दुचाकी ताब्यात घेतली. चौकशी दरम्यान सदरची दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी कडून ५ चोरीचे वाहने जप्त करून कोंढवा पोलीसत दोन व भारती विद्यापीठ पोलीस स्थानकत एक गुन्हा उघडकीस आला आहे.
सदरची कामगिरी अपर आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नारायण शिरगांवकर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, सह पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर, अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस आमदार सचिन सरपाले, चेतन गोरे, शैलेश साठे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अवधूत जमदाडे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केले आहे.












