पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २१ : पुणे येथे ह.भ.प.श्री. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांना सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्या निमित्त सत्कार आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
गोरखे गुरुजींनी विज्ञान आणि अध्यात्म दोन्हींची सांगड घालून समाजाची निरपेक्ष सेवा केली. शिक्षण, वृक्षारोपण, बालविवाह रोखणे अशा विविध सामाजिक कार्यात त्यांचे योगदान लाभलेले आहे. त्यांची साधी राहणी आणि निरपेक्ष उच्च विचारसरणी यामुळे गुरुजींचे समाजात असणारे योगदान हे बहुमूल्य आहे.
यावेळी माजी अध्यक्ष, वैधानिक विकास महामंडळ मा. उल्हास दादा पवार, माजी मंत्री मा. बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मा. जगन्नाथ बापू शेवाळे, आमदार मा. चेतन तुपे पाटील, आमदार मा. संजय जगताप, आमदार मा. अशोक पवार, अध्यक्ष देहू संस्थान ह.भ.प. पुरूषोत्तम दत्तात्रय मोरे-इनामदार, आमदार मा. राहुल दादा कुल, मा. अध्यक्ष जि. प. पुणे मा. प्रदिप कंद, माजी आमदार मा. सुर्यकांत काका पलांडे, उद्योगपती मा. अमन अग्रवाल, उद्योजक मा. रविंद्र आबा काळे, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मतदार संघ, खडकवासला मा. सोपान उर्फ काका चव्हाण, उपाध्यक्ष, संत तुकाराम सा.का.लि. मा. बापूसाहेब भेगडे, ह.भ.प. भानुदास महाराज तुपे, मा. अमित गोरखे, मा. अध्यक्ष आण्णासाहेब साठे महामंडळ व सर्व इतर मान्यवर उपस्थित होते.












