लोणावळा : लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. श्री सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, वडगाव मावळ पो.स्टे हद्दीत मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली आहे. त्यावरून सहा.पोलीस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांनी दिनांक ०१/०५/२०२४ रोजी रात्री त्यांचे पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता पथकाने रात्री ०१.१० वाजताच्या सुमारास टाकलेल्या छाप्यामध्ये वडगाव मधील केशवनगर भागातील एका खोलीमध्ये इसम नामे १) दिब्यांशू श्रीमुलचंद धारिया, वय २१ वर्ष, राहणार केशवनगर,वडगाव, ता.मावळ, जि पुणे याचे ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा १,३७,६७७ रु.(अक्षरी एक लाख सदतीस हजार सहाशे सत्यातर रुपये) किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून नमूद आरोपीचा साथीदार नामे तनविर शेख, राहणार केशवनगर, वडगाव मावळ,जिल्हा पुणे हा पोलिसांची चाहूल लागताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे. सदरचा मुद्देमाल जप्त करून वर नमूद दोन्ही आरोपींविरोधात वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गु. र. क्र.२१३/२०२४ भा.द.वि. कलम ३२८, २७२, २७३, ३४ सह अन्न सुरक्षा अधिनियम २००६ चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पो.हवा.अंकुश नायकुडे, पो.हवा. नितेश कवडे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे यांचे पथकाने केली आहे.