पुणे | प्रतिनिधी
सांगवी येथे पीडब्ल्यू ग्राउंडवरती श्री शिव महापुराण कथा कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. रवी किशनराव यादव यांनी निर्मल सेवा ट्रस्ट संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमामध्ये लाखो भाविक खाजगी वाहनाने येणार असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी व वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी व पार्किंगसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
जुनी सांगवी ते साई चौक नवी सांगवी दरम्यान येण्या – जाण्याचा मार्ग अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. इतर वाहनांसाठी पुढील पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. जुनी सांगवी पाण्याच्या टाकी जवळून बँक ऑफ महाराष्ट्र, माकन चौक जुनी सांगवी किंवा सांगवी फाटा मार्गे इच्छित स्थळी जाण्याचा मार्ग आहे. साई चौक नवी सांगवी महेश्वरी चौक, फेमस चौक नवी सांगवी मार्गे वाहने जातील.
पुढील ठिकाने ही नो पार्किंग झोन घोषित करण्यात आलेली आहेत. साई चौक नवी सांगवी ते पाण्याची टाकी जुनी सांगवी, जुनी सांगवी पाण्याची टाकी ते जुनी सांगवी माकन चौक दरम्यान रस्ताच्या दोन्ही बाजू, माकन चौक जुनी सांगवी ते महेश्वरी चौक नवी सांगवी दरम्यानच्या दोन्ही बाजू, महेश्वरी चौक नवी सांगवी ते साई चौक नवी सांगवी दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजू या नो पार्किंग झोन म्हणून आहेत.












