साऊथ सिनेमाकडे चिरंजीवी आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणातले चिरंजीवी म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके डॅशिंग सुधीर भाऊ मुनगंटीवार. दुर्दैवाने तेहतीस कोटी झाडे लावून महाराष्ट्रात हरीत क्रांती आणलेल्या या वसुंधरेच्या पुत्राचा मंत्रीमंडळातून पत्ता साफ केलेला आहे ..
आपल्या लाडक्या देवाभाऊंनी २०१४ मध्ये पक्ष आणि सत्ता ताब्यात घेतल्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी एक विशिष्ट पॅटर्न राबवला आहे त्यात सर्वप्रथम दानवे दाजी त्यानंतर चंद्रकांत पाटील मग मला या माळेत सुधीर भाऊंचा नंबर लागेल असा अंदाज होता पण बाजी मारली चार्मिंग चंद्रशेखर बावणकुळेंनी त्यानंतर दोनच चेहरे शिल्लक होते . एक चंदेरी नगरीचे राजकुमार आशिष शेलार आणि दुसरे आपले सुधीर भाऊ..
पण देवाभाऊंनी भाजपाचा Dna स्पष्ट करून पुढची बारी सुधीर भाऊंचीच असेल याचे संकेत दिले होते. आता सुधीर भाऊ नंतर पुढची बारी निश्चितच आशिष शेलारांची असणार आहे बाकायदा सत्ता आणि पक्ष देवा भाऊंच्या ताब्यात असायला हवा..
असो भाजपाचे भावी प्रदेशाध्यक्ष सुधीर भाऊंना एडव्हास मध्ये हार्दिक शुभेच्छा