पुणे प्रतिनिधी
पुणे दि.३० : नितीन मस्के खून प्रकरणी ताडीवाला परिसरातील सागर कोळानट्टी टोळीसह १९ जणांना विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ५५ वी कारवाई आहे.
सागर उर्फ यल्ल्या इराप्पा कोळानट्टी (वय ३५), सुशील अच्युतराव सूर्यवंशी (वय २७), मल्लेश शिवराज कोळी (वय २४), मनोज विकास हावळे (वय २३), रोहन मल्लेश तूपघर (वय २३), शशिकांत उर्फ ऋषभ संतोष बेंगळे (वय २१), गुडगप्पा फकीराप्पा भागराई (वय २८), किशोर संभाजी पात्रे (वय २०), साहिल उर्फ सल्ल्या मनोहर कांबळे (वय २०), गणेश उर्फ गणपत शिवाजी चौधरी (वय २४), रोहित उर्फ मच्छी बालाजी बंडगर (वय २०), विकी उर्फ नेप्या काशिनाथ कांबळे (वय २२) इम्रान हमीद शेख (वय ३१), लॉरेन्स राजू पिल्ले (वय ३६), आकाश सुनील गायकवाड उर्फ चड्डी (वय २२), विवेक भोलेनाथ नवघरे (वय २५ रा. बंडगार्डन), अक्षय उर्फ बंटी विजय साबळे (वय २५ रा. मुंढवा) विनायक गणेश काकडे (वय २१ रा.विमाननगर), प्रदीप संतोष पवार (वय २१ रा. विमाननगर), सौरभ बाळू ससाणे (वय २० रा. विमाननगर) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सदर टोळी प्रमुख सागर कोळानट्टी याने काही साथीदारांसह टोळी तयार केली होती. परिसरातील नागरिकांना मध्ये दहशत निर्माण केली होती. खून करणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, मालमतेचे नुकसान करणे, दरोडा घालणे, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहे. १५ ऑगस्टच्या रात्री पुण्यातील मंगला टॉकीजच्या बाहेर दहा ते बारा जणांच्या टोळक्यांनी नितीन म्हस्केवर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता.
या प्रकरणी आरोपीं विरोधात शिवाजीनगर पोलीस स्थानकात भा.द.वी कलम ३०२,१४१, १४२, १४३ ,१४४, १४५, १४८, १४९, १२०, (ब) सह भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७, (१) (३) १३५ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम ३ (१) (R), 3(2) (va), ३ (२) (v) व ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सह पोलीस आयुक्त विश्रामबाग वसंत कुंवर करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस आयुक्त वसंत कुंवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सह पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस आमदार मेमाणे, दिलीप नागरे, रोहित झांबरे यांनी केले आहे.












