पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.२२ : कोंढवा परिसरात अंमली पदार्थची विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडून अटक करण्यात आले आहे. सुमेर जयरामजी बिष्णोई (वय ५० रा. शिवप्रतिष्ठान चौक,कात्रज कोंढवा रोड, मु.पो.जि.जोधपूर, राज्य राजस्थान) चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिह महेंद्रसिह राजपूत असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
पेट्रोलिंग दरम्यान सदर आरोपी हे गोकुळनगर येथील लेन नं.१ मधून कात्रज – कोंढवा रोडवर स्नेहदत्त बिल्डिंग जवळ एक इसम अंमली पदार्थची विक्री करत असल्याची माहिती पोलीस अंमलदार पांडुरंग पवार व सचिन माळवे यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यांच्या कडून ६४ लाख २८ हजार रुपये किंमतीचे ३ किलो २१४ ग्रॅम अफिम अंमली पदार्थ जप्त केले. व इतर दोघांकडून ५२ लाख रुपये किंमतीचे २ किलो ६०२ ग्रॅम अफिम अंमली पदार्थ व मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सह पोलीस आयुक्त गुन्हे 1 सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सह पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार पांडुरंग पवार, सचिन माळवे, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे, मनोजकुमार साळुंखे, संदीप शिर्के, संदेश काकडे, नितेश जाधव, रोहन शेख, योगेश मोहिते यांनी केले आहे.












