पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. २२ : वाहतूक शाखेकडून गणेशोत्सवात मध्यवर्ती भागामधील गणेश मंडळ, वाहनांच्या पार्किंगबाबतची सुविधा एका क्लिकवर उपलब्ध करून दिली आहे. या ‘सारथी’ गणेशोत्सव गाइड २०२३ लिंक आणि क्यूआर कोडचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते गुरुवारी झाले.
माजी खासदार अमर साबळे, आमदार माधुरी मिसाळ, सिध्दार्थ शिरोळे, माजी आमदार जगदीश मुळीक, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आदी या वेळी उपस्थित होते.
‘ सारथी’ गणेशोत्सव गाइड २०२३ चे वैशिष्ट्ये –
– मध्यवर्ती भागातील मुख्य गणेश मंडळे, वाहनतळ यांचा मार्ग पाहता येणार
-उत्सव काळातील बंद रस्ते, पर्यायी चालू रस्ते यांची माहिती
– उत्सवात अधिकाधिक नागरिकांना सहभागी होण्यासाठी ‘सारथी’ गाईडची निर्मिती
– ‘सारथी’ गणेशोत्सव गाइड लिंक व क्यूआर कोड सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध.
मध्यवस्तीतील पाच शाळा आणि सात महाविद्यालयांचे मैदान सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. याशिवाय पार्किंगसाठी महापालिका, इतर खासगी वाहनतळ, नदीपात्रातील माहिती लोकेशननुसार पाहता येणार आहे.












