पुणे : सार्वजनिक रस्त्यावर दारु पिणे साहा जणाना चांगलेच महागात पडले आहे. राज्य उत्पादन शुल्क यांनी त्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. ही घटना सोलापुर बाजार सरकारी कॅनोल शेजारी कॅम्प, पुणे आरोपी सार्वजनिक रस्त्यावर दारु पित बसलेले असताना.
त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम 84 नुसार गुन्हा नोंद केले झाला आहे. आरोपी बापू अप्पा शिंदे वय ५६ वर्षे,राहूल अरूण रासणे वय ४५ रा. कोंढवा राजू थोरात वय ६१ वर्षे रा.लोहानगर,प्रथमेश भाकर वय ३१ वर्षे रा.कोथरूड, आशिष पांडूरंग सकट वय ४२, रा मुळा रोड,मोम्मद हैदर वय ३० वर्षे सदर 03 आरोपीना प्रत्येकी रु. 1200/- प्रमाणे एकुण रु- ३६०० दंड केला आहे. ही कारवाई मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे. चरणसिंग राजपूत व मा. उप अधीक्षक- उत्पादन शुल्क, पुणे शहर संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, निरीक्षक विठ्ठल बोबडे दुय्यम निरीक्षक धवल गोलेकर, दुय्यम निरीक्षक आनंद पाटील, सहायक दुय्यम निरीक्ष हनुमंत इंदलकर, जवान श्री. संकेत ठुबे, जवान श्री. चंद्रकांत नाईक, महिला जवान अश्विनी महिला जवान अर्चना खांडेकर या पथकाने केली आहे.