पुणे : साविञीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहातील भोजनाचा गुणवत्ता ढासळला आहे. का असा पश्र उपस्थित करणारं वृत्त आताच हाती आलं आहे. विद्यापीठातील मेसमध्ये विद्यार्थी खात आसलेल्या पोह्यामध्ये अळी आणि उपीटमध्ये केस आढल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर विद्यार्थीमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहातील विद्यार्थ्यांच्या पोह्यामध्ये अळी आणि उपीटमध्ये केस आढळल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.विद्यार्थी भोजन करत असलेल्या मेसमध्ये प्रकार झाला आहे. सकाळी न्याहारीसाठी तयार केलेल्या पोह्यामध्ये अळी आढळून आली तर उपीटमध्ये केस आढला आहे. या पादार्थांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
विद्यापीठाच्या भोजनगृहातील प्रकारानंतर विद्यार्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारानंतर प्रशासनाने प्राध्यापकांना सामावेश असलेली उपहारगृह आणि भोजनगृह दक्षता समिती तसेच विद्यार्थांचा सामावेश असलेली भोजनगृह गुणवत्ता समिती काय करतेय , असा प्रश्र उपस्थित करत आहे. या प्रकारानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.
साविञीबाई फुले पुणे विद्यापीठातील मेसमध्ये विद्यार्थी खात आसलेल्या पोह्यामध्ये अळी
