सासरच्या जाचाला कंटाळून एका महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना प्रेरणा सोसायटी, रामनगर येथे (ता.११) घडली आहे. या प्रकरणी पती अमित विलास चांदगुडे (वय 40 रा. रामनगर) सासू व सासरे विलास चांदगुडे(वय 65 रा. रामनगर ) यांच्या विरोधात पिंपरी पोलीस स्टेशन मध्ये मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचा विवाह अमित चांदगुडे याच्याशी झाला होता. पीडित महिलेला आरोपी हे वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण व शिवीगाळ करत असे.
तसेच लग्नात मानपान केला नाही, अंगावर सोने नाणे घातले नाही, व लग्नात हुंडा दिला नाही असे म्हणून वारंवार हुंद्यांची मागणी सासरचे मंडळी पीडित महिलेस करत होते. याच कारणामुळे मुलीच्या माहेरकडून आरोपी मुलगा अमित चांदगुडे याला मोटर सायकल घेऊन दिले होते. तरी देखील सासरच्या मंडळींनी छळ करणे काही सोडले नाही. याच जाचाला कंटाळून महिलेने टोकाचा निर्णय घेत राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
आरोपींवर कलम ३०७, ४९८ (अ ),३२३,५०४,३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.या प्रकरणी पुढील तपास सह पोलीस निरीक्षक शेटे करीत आहेत.












