पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ३१ : वहिनीबद्दल गैरसमज करून तिला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून वहिनीने त्यांच्या ननंदे विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी यांची आरोपी महिला ही नात्याने ननंद लागते. फिर्यादी यांच्या सासुबाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. याविषयी गैरसमज करून घेऊन आरोपी महिला दिनांक २९ रोजी त्यांच्या घरी आली. झालेल्या गैरसमजातून तिने फिर्यादी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या दोन्ही हाताचा, उजव्या पायाचा आणि डाव्या कानाचा चावा घेतला आहे.
आरोपीवर भादवि कलम ३२५,३२३,५०४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आले नाही. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार साबळे हे करत आहेत.












