पिंपरी (प्रतिनिधी) :- निगडी येथील दि इंस्टीट्यूट ऑफ़ चॅर्टर्ड अकौंटंट्स ऑफ़ इंडिया( आयसीएआय) पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता वाणिज्य शाखेतील करिअर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
दि ८ सप्टेंबर २०२३ रोजी स. १० वा सिद्धिविनायकनगरी निगडी येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी वाणिज्य क्षेत्रातील नामवंत प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाईल. आयसीएआय पिंपरी चिंचवड शाखेचा मुख्य उद्देश इयत्ता आठवी, त्यापुढील माध्यमिक, वरिष्ठ/उच्च माध्यमिक, पदवी/पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये सीए अभ्यासक्रमावर विशेष लक्ष केंद्रित करून वाणिज्य शिक्षणाला चालना देणे आहे.
करिअर इन अकाउंटिंग अँड फायनान्स फॉर यूथ (CAFY) आणि सुपर मेगा करिअर समुपदेशन शीर्षकाचा कार्यक्रम प्रोग्राम पॅन इंडिया ज्याची खालील उद्दिष्टे आहेत:
1. विद्यार्थ्यांसाठी करिअर समुपदेशन.
2. वाणिज्य शिक्षणाचा प्रचार.
3. आर्थिक साक्षरता.
4. अकाउंटन्सी म्युझियमची स्थापना.
या ८सप्टेंबर २०२३ रोजी होणाऱ्या सुपर मेगा करिअर कौन्सिलिंग च्या नियोजनासाठी बैठक घेण्यात आली. या वेळी शाळा / महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि समुपदेशक आणि ५० सनदी लेखापाल उपस्थित होते.
कार्यक्रम आयोजन बैठकीला आयसीएआय पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष सीए सचिन बंसल,उपाध्यक्ष सीए पंकज पाटणी, सचिव,सीए सारिका चोरडिया खजिनदार सीए शैलेश बोरे,सीए विद्यार्थी संघटना अध्यक्ष (विकासा) सीए वैभव मोदी, सीए विजयकुमार बामणे माजी अध्यक्ष व सी ए सचिन ढेरंगे आदी उपस्थित होते.












