पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २५ : पुणे परिसरातील सूर्य इलेक्ट्रॉनिक्स च्या गोडाऊन मधील एल.ई.डी टीव्ही चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना महाळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
गोविंदराम रत्नलाल माळी ( वय ३८, रा.ग्रीन इस्टेट सोसायटी, चाकण ) यांनी एका अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
दिनांक २२ रोजी नाशिक हायवे येथे असलेल्या एम.आर सूर्या इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या गोडाऊन मध्ये कोणी अज्ञात इसमाने गोडाऊनचे शटर उचकटून त्याद्वारे आत प्रवेश केला. गोडाऊन मध्ये असणारे एकूण २५,१७,०८७ रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे एल.ईडी टीव्ही फिर्यादी यांच्या संमतीशिवाय चोरून नेले आहेत.
आरोपीवर भादवि कलम ४६१,३८० अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करत आहेत.












