पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २९ : दक्षिणेतील अभिनेता विशालने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) वर लाच घेतल्याचा आरोप केला आहे. तो स्वत: पीडित असल्याचे त्याने सांगितले.
त्याने सांगितले की, त्याच्या नुकत्याच आलेल्या ‘मार्क अँटनी’ या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन पास करण्यासाठी त्याला ६.५ लाख रुपयांची लाच द्यावी लागली. विशालने सोशल मीडियावर सांगितले की, त्याचे कष्टाचे पैसे भ्रष्टाचारात गेले. त्याला सत्य सर्वांसमोर आणायचे आहे.
यासोबतच त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत या प्रकरणाची चौकशी करावी, असे आवाहन केले.त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. ही लाच कार्यालयात नेमकी कोणी स्वीकारली हे अद्याप समजू शकलेले नाही.












