सेलू : मराठी मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या सेलू येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तालुका अध्यक्ष पत्रकार संघ मेळावा व आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळ्यास सामाजिक न्याय मंत्री ना.संजय शिरसाट हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे यांनी दिली आहे या बाबत माहिती अशी की दिनांक दिनांक 1 फेब्रुवारी 25 रोजी सेलू येथील साई नाट्य मंदिर येथे राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अद्यक्ष यांचा मेळावा व आदर्श तालुका संघ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण काल मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, मो. इलियास, मोहसीन भाई, कांचन कोरडे, शेख राज यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या औरंगाबाद येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना पत्रकार परिषदेच्या वतीने सेलू येथील मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण दिले असता त्यांनी ते स्वीकारले असून मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमास उपस्थित राहणे हे आपल्यासाठी गौरवपूर्ण बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या वेळी त्यांनी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त मा. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मराठी पत्रकार परिषद पत्रकारांच्या कल्याणासाठी करत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले असून आपण निश्चित सेलू येथे येणार असल्याचे मराठी पत्रकार परिषद व सेलू तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकारयांना बोलताना आवर्जून सांगितले. सेलू येथील तालुका अद्यक्ष मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे.
सेलू येथील राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्यास मंत्री संजय शिरसाट उपस्थित राहणार
