केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्यामुळे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पालखेड उप बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात १ हजार रुपयांची घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पालखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या भावात एक हजार रुपयाची घसरण झाल्याच्या दिसून येत असून केंद्र सरकारच्या धरसोडीच्या धोरणाला शेतकरी हैराण झाला आहे. केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्याने या सोयाबीनच्या दरामध्ये घसन झाल्याचे देखील यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
सध्या सोयाबीनला चार हजार ते चार हजार दोनशे रुपये भाव मिळत असल्याने केलेला उत्पादन खर्च देखील निर्णय मुश्किल झाले नाही सोयाबीनला सात ते साडेसात हजार रुपये भाव द्यावा जेणेकरून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च निघेल अशी अपेक्षा आता सोयाबीन उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे. तरी सरकारने सोयाबीन आयात करू नये अशी देखील मागणी शेतकरी करत आहे.